Online 11th addmission आज आपण पाहणार की अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आहे अकरावीची पहिली यादी कधी लागणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला विद्यार्थ्यांना काय काळजी घ्यावी लागेल याविषयी आपण माहिती बघणार आहोत अकरावी प्रवेश बाबत एक महत्त्वाचे अपडेट आलेले आहे तर बघूया संपूर्ण माहिती.
Online 11th addmission संपूर्ण माहिती
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे दहावी बोर्डाचा निकाल यावर्षी सरासरी लवकर लावण्यात आला त्याचा एकमेव कारण म्हणजे अकरावी प्रवेशात कुठलेही अडचण होऊ नये आणि फेरपरीक्षा ही लवकर घेण्यात यावी त्यामुळे विद्यार्थ्यांचा पुढील शिक्षण नुकसान होऊ नये यामागचा हा मोठा उद्देश होता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली त्याच्यामध्ये सुरुवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या त्यानंतर वेबसाईट दोन-तीन दिवस बंद ठेवण्यात आली त्यानंतर परत वेबसाईट सुरू करण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे फॉर्म प्रक्रिया सुरू झाले. आता पहिली जी गुणवत्ता असते यादी सामाईक त्यालाच आपण जनरल मेरिट लिस्ट म्हणतो ती यादी देखील आठ तारखेला जाहीर झालेली आहे आणि प्रत्यक्ष जे आहे प्रवेश करील ती उद्या लागणार आहे त्यामुळे तुम्ही जे कॉलेज सिलेक्ट केले असेल वगैरे ते त्याची उद्या पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे आणि 11 तारखेपासून प्रत्यक्ष कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे तर बघुयात संपूर्ण याविषयी माहिती.
Online 11th addmission अकरावी प्रवेश नोंदणी यंदा राज्यभर ऑनलाइन आणि केंद्रीय पद्धतीने राबवण्यात आली. यात विद्यार्थी नोंदणीच्या अंतिम मुदतीमध्ये एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. तर वेळापत्रकानुसार, शून्य फेरी गुणवत्ता यादी (Zero round merit list) ८ जून २०२५ रोजी जाहीर होईल अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे प्रभारी संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली आहे.
या प्रक्रियेसाठी पहिल्या फेरीमध्ये एकूण ९ हजार ४३५ शाळा / महाविद्यालयांची नोंदणी झालेली आहे. त्यात एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमता २१ लाख २३ हजार ४० इतकी आहे. त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता १८ लाख ९७ हजार ५२६; तर कोटा प्रवेश क्षमता २ लाख २५ हजार ५१४ आहे. ही नोंदणी प्रक्रिया दि. २६ मे ते ५ जून दरम्यान महामंडळाच्या https://mahafyjcadmissions.in/landing या अधिकृत संकेतस्थळावरून राबविण्यात आली आहे.
यामध्ये १२ लाख १५ हजार १९० विद्यार्थ्यांनी नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क ऑनलाइन जमा केले आहे. तर ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केले आहे. नियमित फेरी (कॅप राऊंड) साठी ११ लाख २९ हजार ९३२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. इनहाऊस कोटासाठी ६४ हजार २३८ विद्यार्थ्यांनी, तर व्यवस्थापन (मॅनेटमेंट) कोटासाठी ३२ हजार ७२१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. अल्पसंख्याक (मायनॉरिटी) कोटासाठी ४७ हजार ५७८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे.
शून्य फेरी गुणवत्ता यादी ८ जूनला लागली आहे
वेळापत्रकानुसार शून्य फेरी गुणवत्ता यादी ८ जून २०२५ रोजी जाहीर होणार असून, दि. ९ जून ते ११ जून या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत. कॅप फेरीची गुणवत्ता यादी १० जून रोजी जाहीर होणार असून, दि. ११ ते १८ जून दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश होणार आहेत.
अशाप्रकारे आपण पाहिलं की 11 वी प्रवेशाची पहिली फेरी ही उद्या लागणार आहे याची माहिती आपण घेतली आहे आमच्या लेटेस्ट अपडेट साठी सर्वप्रथम व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा पहिली ते दहावी ऑनलाईन कोचिंग क्लासेस साठी9322515123 या क्रमांकावर फोन करा किंवा नाना फाउंडेशन ॲप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा